Breaking

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

*डॉ.जे. जे. मगदूम कॉलेज इंजीनियरिंगच्या ०३ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड*


डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


    जयसिंगपूर : येथील डॉ.जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील कॉम्प्युटर विभागाच्या ०३ विद्यार्थ्यांची,अस्मिग्रेड प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड  झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद यांनी दिली.

           नोकरी निवडीमध्ये आर्यन शिंदे, अनुराग कुरणे  व मयुरी तहसीलदार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे सदरहू विद्यार्थ्यांना वार्षिक रु. ४ ते रु. ६ लाखाचे पॅकेज कंपनीने घोषित केले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी. माळगे  यांनी दिली. 

      ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

     विभाग प्रमुख डॉ. अर्चना चौगुले, प्लेसमेंट कॉर्डिनेटर प्रा. रोहित माने यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा