Breaking

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

*शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेला १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ : संचालक डॉ. अजितसिंह जाधव*

 

शिवाजी विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळ


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील (ऑक्टोबर-नोव्हेंबर) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यादिवशी बी. ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी. अभ्यासक्रमांपासून परीक्षांचा प्रारंभ होणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आज जाहीर केले.

    गेल्या सत्रापर्यंत पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा संलग्नित महाविद्यालय, तर तृतीय वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाकडून घेतल्या. मात्र, महाविद्यालयांकडील या परीक्षांबाबत काही मुद्दे उपस्थित झाल्याने विद्यापीठाने पदवीच्या तिन्ही वर्षांच्या परीक्षा आपल्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता हिवाळी सत्रातील परीक्षा होणार आहे. विविध अभ्यासक्रमांच्या ८६५ परीक्षा होणार आहे. अशी माहिती या मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा