*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव हा महाविद्यालयीन युवकांसाठी एक महत्त्वाचा वार्षिक कार्यक्रम असून तो युवकांमधील सृजनशीलता,विविध कला , आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेमधील विविधता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित केला जात असल्याचे मत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ.ढमकले यांनी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे दि...रोजी संपन्न होणाऱ्या जिल्हा युवा महोत्सवा आयोजनाच्या अनुषंगाच्या बैठकीमध्ये व्यक्त केले.या बैठकीस अध्यक्षस्थानी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे होते व या प्रसंगी सचिव डॉ. महावीर अक्कोळे, ऍड स्वागत परुळेकर , राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले, माजी संचालक प्रा.डॉ.पी.टी.गायकवाड, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे हे उपस्थित होते.
डॉ. ढमकले पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे कलाकार घडविले जात आहेत. विद्यार्थ्यांचा ही यासाठी उदंड प्रतिसाद असतो. त्यामुळे जयसिंगपूर कॉलेजमधील हा युवा महोत्सव शिवाजी विद्यापीठाच्या व जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर यांच्या प्रतिष्ठेला साजेसा होईल असा यशस्वी होईल असा विश्वास आहे.
याप्रसंगी विद्यार्थी विकास मंडळाचे माजी संचालक डॉ.पी.टी.गायकवाड म्हणाले, दरवर्षी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे यांच्याद्वारे हा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाचे उद्दिष्ट युवकांना त्यांची कौशल्ये, कला आणि सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याची संधी देणे आहे. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून युवा महोत्सवामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत व सहकार्य केले जात असते.विद्यापीठाची सांस्कृतिक परंपरा ही उच्च कोटीची असून यासाठी आपणास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
यावेळी युवा महोत्सव कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. अतिग्रे म्हणाले, युवा महोत्सवामध्ये संगीत, नृत्य, रंगभूमी, खेळ, चित्रकला, साहित्य, हस्तकला आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो.यामध्ये भाग घेणारे युवक कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात त्यामुळे विद्यापीठाच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन घडते. यासाठी जयसिंगपूर कॉलेजच्या माध्यमातून ही परंपरा अखंडित राहील व उत्तम संयोजनाचा अनुभव येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रा. शंतूनु पाटील यांनी जिल्हा युवा मोर्चाच्या अनुषंगाने तांत्रिक बाबींची सर्वकष माहिती दिली.सौ.आडके मॅडम यांनी युवा महोत्सवाच्या बाबत आपला अनुभव कथन केला.
या प्रसंग अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष अडदंडे म्हणाले, हा युवा महोत्सव सोहळा आमचा बहुमान असून हा परिपूर्ण व यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत ."
सदर कोल्हापूर जिल्हा युवा महोत्सव नियोजनाच्या बैठकीस विद्यापीठातील मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, सांस्कृतिक विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ.सौ. विजयमाला चौगुले,कॉ लेजचे सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
या संवाद व संयोजन बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी केले. डॉ. एन.एल.कदम यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस. आर. नकाते यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा