*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांच्या सहभागाद्वारे नेतृत्व गुणांचा विकास करून सामाजिक व सांस्कृतिक एकात्मता वाढविता येत असल्याचे प्रतिपादन प्र.कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील यांनी कोल्हापूर जिल्हास्तरीय ४४ वा युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे होते. याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य ऍड.एस.जी. परुळेकर, डॉ. आर.डी.ढमकले, प्र.संचालक डॉ. टी.एम.चौगले, माजी संचालक डॉ.पी.टी गायकवाड,डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील व प्राचार्य डॉ. मांजरे उपस्थित होते.
प्र.कुलगुरू डॉ.पाटील पुढे म्हणाले, हा महोत्सव म्हणजे सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा कार्यक्रमाचा उत्सव असतो ज्यामुळे सर्व घटकांच्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होत असते. हा युवा महोत्सव म्हणजे मनोरंजन व कलेचा आविष्कार करणारा उत्सव असल्याचं मत प्र.संचालक डॉ.टी.एम.चौगले यांनी मांडले.
कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, प्रास्ताविक प्रा.डॉ. व्ही.व्ही. चौगुले व पाहुण्यांचा परिचय डॉ. एन.एल.कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी.चौगुले व प्रा. अंजना चावरे यांनी केले. प्रा.डॉ.आर.डी.माने यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सव संयोजन समितीचे सर्व सदस्य, कॉलेज स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे कलाकार विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा