![]() |
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर |
प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
हातकणंगले : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रविकांत शिंदे, वय ५०, सध्या,रा. मोरे यांचे घरी भाड्याने पाच तिकटी, हातकणंगले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, मूळ गाव रा.फणसवाडी, ता. भुदरगड यांना १६ हजाराची लाच घेताना लाचलूचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली.
याबाबत अधिकृत सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे कुंभोज, ता. हातकणंगले येथे किराणा मालाचे दुकान आहे. तक्रारदार हे किराणा मालाचे दुकानात गुटखा विक्री करतात. दरम्यान हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांना साधारण एक महिन्यापूर्वी पोलीस ठाण्यात भेटण्यास बोलावून तुम्ही गुटखा विक्री करतात तुमच्यावर कायदेशीर कारवाई न करता गुटखाविक्री करायचे असेल तर मला प्रति महिना १० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करतो अशी भीती घातली. त्यानंतर दिनांक १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४.४५ वाजता तक्रारदार यांचे फोनवर फोन करून तक्रारदार यांना पोलीस ठाणे भेटण्यास बोलावले. तक्रारदार भेटण्यास गेले असता पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे गुटखा विक्री करायचे असल्यास प्रति महिना १० हजार रुपयाची मागणी करून तडजोडीअंती ४ हजार रुपये प्रति महिना प्रमाणे मागील चार महिन्याचे मिळून १६ हजार रुपयाची तक्रारदार यांच्याकडे मागणी केली.
या घटनेबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत विभाग कार्यालयाकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस हवालदार रविकांत शिंदे यांचे लाच मागणीची पडताळणी केली असता पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे १६ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण झाले. तक्रारदार यांच्याकडे १६ हजारची मागणी केली. मागणी केलेप्रमाणे पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांचेकडून १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना आज शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २.०० वाजता रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाच प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी व पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत शाखेचे पोलीस निरीक्षक बापु साळुंके, सापळा पथक पो.ह. सुनील घोसाळकर, संदीप काशीद, पो.ना. सचिन पाटील, संदीप पवार व कुराडे यांनी सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा