![]() |
प्रथम सत्रात मार्गदर्शन करताना प्रा. सुरज चौगुले, प्रा. विश्रांती चव्हाण, अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर माने व डॉ. वंदना देवकर |
*प्रा.डॉ.महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर, २०२४ रोजी अर्थशास्त्र विषयाची नेट-सेट कार्यशाळा दोन सत्रात संपन्न झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सुरज चौगुले व अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. वंदना देवकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.या कार्यशाळेचा उद्देश विशद करताना त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तांत्रिक आणि शैक्षणिक तयारीसाठी योग्य मार्गदर्शन मिळवून देणे तसेच पेपर क्रमांक १, २ व ३ ची तयारी कशी करावी याबाबत महत्त्वाचे कौशल्य व टिप्स विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे हा होता.
प्रथम सत्रात तज्ञ प्राध्यापक डॉ. सुरज चौगुले यांनी पेपर क्रमांक १ च्या बाबत मार्गदर्शन दिले, ज्यात विशेषतः संशोधन आणि शिक्षणाची भूमिका, अध्यापन तंत्रज्ञान, आणि सामान्य बुद्धिमत्ता यावर भर दिला.नेट-सेट परीक्षेतील बदलांवर चर्चा झाली, विशेषतः नवीन पॅटर्न, परीक्षा स्वरूप आणि ऑनलाइन स्वरूपातील आव्हाने कशी हाताळावीत यावर मार्गदर्शन देण्यात आले. विद्यार्थ्यांना योग्य अभ्यास पद्धती, नोट्स बनवण्याच्या पद्धती, आणि परीक्षेतील वेळ व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितले गेले.
द्वितीय सत्रात प्रा.विश्रांती चव्हाण यांनी अर्थशास्त्र विषयाबाबत अर्थात पेपर क्रमांक २ व ३ ची तयारी कशी करावी यासाठी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. सेट-नेट साठीची महत्त्वाची पाठ्यपुस्तके,संदर्भ ग्रंथ व अद्यावत अर्थशास्त्रीय माहितीसाठी इंडियन इकॉनोमी व अन्य पुस्तकांचा संदर्भ दिला. अर्थशास्त्रातील सूक्ष्म, स्थूल व संख्याशास्त्र या विषयाबाबतचे महत्व विशद करीत संक्षिप्त आढावा व टिप्स दिल्या. मॉडेल प्रश्नपत्रिका चा वापर करून नेट-सेटची उत्तम तयारी करणेबाबत माहिती दिली. आपल्या विषयाच्या वैयक्तिक तयारीचा तौलिनक अभ्यास करण्यासाठी इतर कार्यशाळेत सहभागी व्हावे किंवा समूहामध्ये अभ्यास करावा.
या कार्यशाळेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी राखीव केलेले शंका निरसन सत्र होते. यात तज्ञांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासंबंधी शंका निरसन करून त्यांना योग्य दिशानिर्देश दिले. यामुळे परीक्षार्थींमध्ये नेट/सेट परीक्षेसाठी आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. विद्यार्थ्याच्या मागणीनुसार पुन्हा अशा कार्यशाळेची आयोजन केले जाणार असल्याची माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रभाकर माने म्हणाले, अशा कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासाबाबत चिकित्सा वृत्ती,मनोबल वाढून अभ्यासाचा काही ट्रिक्स मिळतात यामुळे विद्यार्थ्यांना यश लवकर संपादित करता येते.
या कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
पाहुण्यांचा परिचय कु. करुणा ढाले, आभार कु. करिष्मा ढाले यांनी मानले. सूत्रसंचालन कु.गीतांजली जाधव यांनी केले.
नेट - सेट परीक्षेच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा