Breaking

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०२४

*डॉ. मगदूम कॉलेजच्या ३२ विद्यार्थ्यांची प्लेसमेंटसद्वारे निवड*

 

डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूर निवड झालेले विद्यार्थी व सन्माननीय प्राध्यापक


प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*


     जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या ३२ विद्यार्थ्यांची क्यूस्पायडर या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग चे १७ विद्यार्थी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे ११ व इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन विभागाचे ४ विद्यार्थी आहेत.

     ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हॉइस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी.माळगे यांचे अभिनंदन केले.

    नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुराग कुरणे, महावीर मगदूम, तनुश्री शिंदे, प्रणव शिकरखाने, आकांक्षा गायकवाड, दिपाली झिटे, श्रावणी पटनशेट्टी, वृषाली माळी, वैष्णवी चव्हाण, निकिता धोंड, शर्वरी  कुलकर्णी,आर्यन पाटील, तेजस रांगट, दक्षा निकम, रोहन सावंत, वैभव चव्हाण, अभिषेक मगदूम, अथर्व दिवटे,  भारत कुंडेकर,अंतरी इंदुलकर , प्रज्ञा वासुदेव, प्रथमेश राऊत,साक्षी कोळेकर, सलोनी देसाई, सानिका पाटील, श्रेयश  देशमाने, सुयोग मोहिते, ऋषिकेश घोडके, सानिका मोहिते,प्रथमेश गोडसे, रणजीत पाटील व ओंकार तिबिले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

        सदर विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख डॉ. अर्चना चौगुले, प्रा. राजेश भारतीय, प्रा. मंदार कोलप प्लेसमेंट समन्वयक प्रा. रोहित माने, प्रा. सीमा बंडगर यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट टीमचे अभिनंदन केले व  शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा