Breaking

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

*जयसिंगपूरच्या डॉ.जे. जे.मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंटद्वारे नोकरीसाठी निवड*


डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूर 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


    जयसिंगपूर :  येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिव्हिल विभागातील ०३ विद्यार्थ्यांची 'इंडोव्हान्स' पुणे या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.गोपाळ मुलगुंद यांनी दिली. इंडोव्हान्स ही आऊटसोर्सेसद्वारे सुविधा पुरविणारी जगातील नामांकित कंपनी असून पुणे या ठिकाणी कार्यरत आहे.

       ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हॉइस चेअरपर्सन ॲड. डॉ.सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी कु. अश्विनी माळी, जुनेद बागवान, सम्मेद खवाटे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मनस्वी शुभेच्छा दिल्या.

     ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी.पी. माळगे, सर्व विभाग प्रमुख, ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर्स प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा