Breaking

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

*मगदूम फार्मसी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रचनात्मक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दिवाळी साजरी*

 

राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने गरजू घटकांना कपडे व फराळाचे पदार्थ वितरित करताना प्राध्यापक व विद्यार्थी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


   जयसिंगपूर :  डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचलित, अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती यांच्या एन. एस. एस.  विभागाकडून श्रावणबाळ विकलांग वसतिगृह, नांदणी आणि आई वृद्धाश्रम, चिपरी येथील लोकांना दिवाळी सणानिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले तसेच माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत गल्ली न. १२, जयसिंगपूर येथे कपडे देण्यात आले.

     सामाजिक जाणीविचे भान ठेवून,सदर सामाजिक उपक्रमासाठी  संस्थेचे अध्यक्ष, डॉ. विजयराज मगदूम व  उपाध्यक्षा तथा सेक्रेटरी ॲड. डॉ. सौ. सोनाली मगदूम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका, सौ. शीतल डवरी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते . सदरच्या कार्यक्रमाकरिता संस्थेचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी व विध्यार्थीनी सहभाग घेतला. महाविद्यालयाने केलेल्या या सामाजिक उपक्रमाबाबत ट्रस्टचे  चेअरमन यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले व वसतीगृहातील विकलांग विद्यार्थी, वृद्ध आश्रमातील वृद्धांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

      या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा