Breaking

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

*संशोधन हे नेहमी समाजोपयोगी व कल्याणकारी असले पाहिजे : डॉ. मनोहर कोरे यांचे प्रतिपादन*

 

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. मनोहर कोरे, डॉ. संतोषकुमार यादव, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व उपस्थित अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : गरज ही शोधाची जननी असून आपल्यासमोर सतत प्रश्न निर्माण झाले पाहिजेत जेणेकरून संशोधन वृत्ती निर्माण झाली पाहिजे अर्थात प्रश्न निर्माण होणे ही संशोधनाची पहिली पायरी आहे. जगातील बदल हे संशोधनामुळे झाले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाचा उपयोग समाज कल्याण व नव परिवर्तनासाठी कसा होईल याचा विचार करून संशोधन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विलिंग्डन काॅलेज,सांगली येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मनोहर कोरे यांनी केले.

    श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व पदव्युत्तर पदवी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च प्रपोजल आणि स्टॅस्ट्याटिक्स या विषयावर आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. मनोहर कोरे बोलत होते.

    कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आले.कार्यशाळेत बीजभाषक म्हणून प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी सांगोपांग पद्धतीने मार्गदर्शन केले.

     कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात देवचंद काॅलेज,अर्जुननगर येथील डॉ. संतोषकुमार यादव यांनी या विषयाला स्पर्श करीत संशोधना संदर्भात अनेक बाबी सविस्तरपणे मांडल्या.

  कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रोफेसर डॉ.बी.एन.रावण, ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस.कुरलीकर,ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार, प्रा.टी.एस.कवठेकर होते.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.एम.के.कांबळे यांनी केले पाहुण्यांची ओळख डॉ.मनिषा पाटील यांनी करुन दिली आभार प्रा. एम.वाय.पोवार यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.डी.एच.नाईक यांनी केले.

    या कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा