![]() |
स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन करताना प्रा. कु. यास्मिन मुल्ला |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर, २०२४ रोजी 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व तयारी' या विषयावर प्रा. कु.यास्मिन मुल्ला यांचे व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. कु.यास्मिन मुल्ला मार्गदर्शन करताना म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उचित ध्येय, उत्तम रणनीती, दृढ निश्चय, जिद्द, चिकाटी , प्रामाणिक प्रयत्न व अभ्यासाचे आधुनिक तंत्रज्ञानाची कास याच्या माध्यमातून यश संपादित करता येते. आणि खऱ्या अर्थाने हेच घटक स्पर्धा परीक्षेच्या यशाची गुरुकिल्ली आहे.प्रा. मुल्ला यांनी विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी व परीक्षेतील महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी भाष्य केले. तसेच अभ्यासाची योग्य पद्धत, वेळेचे व्यवस्थापन, आणि सकारात्मक मानसिकतेचे महत्त्व या गोष्टींवर मार्गदर्शन केले. तसेच चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर विशेष भर दिला.
प्रा. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाची विशेष बाब म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आधुनिक दृष्टिकोन आणि नव्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करण्याबाबत सांगितले. डिजिटल साधनांचा वापर, AI आधारित ॲपचा वापर, डेटा विश्लेषण आधारित मॉक टेस्टस, माहितीपट आणि शैक्षणिक व्हिडिओचा वापर, नॅनो लर्निंग, मानसिक तयारी आणि एकाग्रता साधने ,प्लॅनिंग टूल्स व प्रमोडोरो टेक्निक चा वापर केला पाहिजे. जेणेकरून पारंपारिक अभ्यास पद्धतीच्या तुलनेत हे तंत्र अधिक फायदेशीर ठरते.
अध्यक्षीय भाष्य करताना डॉ. प्रभाकर माने म्हणाले, आजच्या घडीला स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे अत्यंत कष्टप्रद असून यासाठी स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी कशी करावी, वेळेचा सदुपयोग कसा करावा, आणि ताणतणाव कसे हाताळावे याबद्दल मौल्यवान मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रश्नोत्तर सत्रही आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून प्रा.मुल्ला यांनी समाधान व्यक्त केले.
रोहन लाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.तर पाहुण्यांचा परिचय कु. करुणा ढाले यांनी केले. कु. करिष्मा ढाले यांनी आभार व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले यांचं मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वंदना देवकर, प्रा. विश्रांती चव्हाण, प्रा. मेहबूब मुजावर व एम. ए. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा