![]() |
पिंटू मगदूम फार्मसी कॉलेज चे चेअर पर्सन डॉ. विजयराज मगदूम, Adv. सौ.सोनाली मगदूम, प्राचार्य डॉ. सचिन निटवे व सन्माननीय प्राध्यापक |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील पिंटू उर्फ अनिल मगदूम फार्मसी कॉलेजला महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल (MSPC), मुंबई यांच्या वतीने विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला.रील स्पर्धा व उत्कृष्ट जागतिक औषधनिर्माता दिन साजरा करणाऱ्या फार्मासिस्ट्स, संस्था, संघटना, कॉलेज, औद्योगिक व शासकीय / निमशासकीय औषध निर्माण अधिकारी, एफ. डी. ए. अधिकारी आणि वैद्यकीय प्रतिनिधी यांच्यासाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसी कॉलेजला पश्चिम महाराष्ट्रातून या स्पर्धेचे विशेष सन्मानाचे मानकरी म्हणून जाहीर केले आहे. तसेच अध्यापिका सौ. एम. वाय. सोनलकर यांचे 'पेशंट कौन्सलिंग फॉर इनफरट्यालिटी' या विषयावरील "रील" हे पश्चिम विभागातील 'बेस्ट रील'म्हणून घोषित केले आहे.
फार्मासिस्ट दिवसानिमित्त महाविद्यालयाकडून औषध साक्षरता अभियान, फार्मा रॅली, राज्यस्तरीय रील मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या विशेष उपक्रमाकरिता महाविद्यालयास फार्मसी कौन्सिल, मुंबई यांच्याकडून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देन्यात येणार आहे.चालू शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी राज्य व देशपातळीवर विविध स्पर्धेमध्ये १४ बक्षिसे मिळवली आहेत.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हाइस चेअरपर्सन तथा सेक्रेटरी डॉ. सोनाली मगदूम यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा