Breaking

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

*विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास व भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सह शैक्षणिक उपक्रमांची गरज : प्रा.डॉ. प्रभाकर माने यांचे प्रतिपादन*


कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. प्रभाकर माने व प्रा.डॉ. जयवंत इंगळे व डॉ.संतोष पोरे


*प्रा.डॉ.महावीर बुरसे : उपसंपादक*


मलकापूर : येथील डॉ.एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर- पेरिड मध्ये  'सह शैक्षणिक अभ्यासक्रमाचे समावेश आणि परिणाम 'या विषयावर आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्य शाळेत प्रमुख साधन व्यक्ती अर्थतज्ञ प्रा.डॉ. जयवंत इंगळे व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचे डॉ. प्रभाकर माने व  अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. संतोष पोरे उपस्थित होते. 

     प्रथम सत्रात डॉ. प्रभाकर माने मार्गदर्शन करताना म्हणाले की, सह शैक्षणिक अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचा व मोठा वाटा आहे. या विषयातील उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर शारीरिक, मानसिक आत्मिक, विचारशील व सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम बनवतात. महाविद्यालयात अशा उपक्रमाच्या समावेशामुळे विद्यार्थ्यांचा सर्वकष विकास व भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतील.ते पुढे म्हणाले की, कला व सांस्कृतिक उपक्रम, क्रीडा आणि शारीरिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, पर्यावरणीय उपक्रम व अशा अनेक उपक्रमामुळे विद्यार्थी परिपूर्ण होत असतात. या सह शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून वैयक्तिक विकास, शैक्षणिक कामगिरीत गुणवत्तापूर्ण सुधारणा, संवाद कौशल्ये, टीमवर्क आणि नेतृत्व, क्रीडा व कला मुळे शारीरिक व मानसिक ताण कमी होतात.

        द्वितीय सत्रात अर्थतज्ञ प्रा.डॉ. जयवंत इंगळे साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थी घटक हा कौशल्यपूर्ण व रोजगारक्षम  बनणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती बरोबर व व्यावहारिकतेची जोड मिळणार असून विद्यार्थी हा परिपूर्ण बनणार आहे. 

     कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

       प्रा.डॉ. संतोष पोरे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण हे बहुविद्याशाखीय असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक आहे.या सह शैक्षणिक अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी हा विविध क्षेत्रात कार्यप्रवण होत आहे.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.सचिन चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. भास्कर चिखलीकर यांनी मानले.

    या कार्यक्रमाचं आयोजन प्रा.डॉ. जयवंत इंगळे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा.बी.ए.सुतार उपस्थित होते. 

      या कार्यशाळेस परिसरातील तीन कॉलेज मधील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या कार्यशाळेबाबत विद्यार्थ्याकडून समाधान व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा