Breaking

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

*अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १३ टक्के लाभांश वाटप*


सभासदांना लाभांश वाटप करताना पतसंस्थेचे संस्थापक डॉ. सुभाष अडदंडे, चेअरमन प्रा.के.बी.पाटील, व्हाईस चेअरमन प्रा.पी.सी.पाटील, संस्थेचे संचालक, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अन्य मान्यवर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज कॅम्पस मधील अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १३ टक्के लाभांश वाटप करून सभासदांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.

        दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही  सभासदांचे हित जपत सभासदांना १३ टक्के लाभांश वाटप करण्यात आले. पतसंस्थेचे संस्थापक डॉ. सुभाष अडदंडे व संस्थेचे चेअरमन प्रा. के.बी.पाटील यांच्या हस्ते लाभांश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते. 

     अनेकांत नागरी सहकारी पतसंस्था सामाजिक जबाबदारी सांभाळत महापूर, कोरोना महामारी, अन्य बिकट प्रसंगी आर्थिक मदत केली आहे. दिवंगत सभासदांच्या परिवाराला आर्थिक उभारी देण्याचे काम करत असते. सन २०२४-२५ पासून विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व सभासदांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

   सभासदांच्या बाबत असलेली संवेदनशीलता व सामाजिक जबाबदारी आणि नेहमीप्रमाणे दिला जाणारा लाभांश यामुळे सभासदाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

      संस्थेचे चेअरमन प्रा. के बी पाटील, व्हाईस चेअरमन प्रा.पी.सी.पाटील, तज्ञ संचालक महावीर पाटील संस्थेचे सर्व विद्यमान संचालक, प्रा.एम.एस.पाटील,अभिजीत अडदंडे, प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, संजय चावरे, सुहास हिरूकडे ,प्रा. प्रदीप सुतार, सुनील कणसे व हिरालाल पवार, पतसंस्थेचे कार्यशील मॅनेजर राहुल पाटील व संस्था कर्मचारी सुधाकर पाटील याचे काम संस्था व सभासद घटकांसाठी लाभदायक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा