Breaking

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

*शिवाजी विद्यापीठ सुधारित परीक्षा ; डिप्लोमा १२ , पदवी २६ नोव्हेंबर व पदव्युत्तर अभ्यासक्रम ४ डिसेंबर पासून प्रारंभ : संचालक डॉ. अजितसिंह जाधव*


संचालक प्रा.डॉ. अजितसिंह जाधव, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ऑक्टो. नोव्हे, २०२४ हिवाळी सत्रामध्ये होणा-या परीक्षेच्या सुधारित तारखा खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती संचालक डॉ. अजित सिंह जाधव यांनी दिली. 

    डिप्लोमा, पी. जी. डिप्लोमा, सर्टिफिकेट अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी हे इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेतात त्यामुळे सदर अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. १२ नोव्हे, २०२४ पासून प्रारंभ करण्यात येत आहेत.

      ऑक्टो. २०२४ मधील कला, वाणिज्य व विज्ञान पांरपारिक अभ्यासक्रमाच्या पदवी स्तरावरील परीक्षा दि. २६ नोव्हें. २०२४ पासून प्रारंभ करण्यात येत आहेत.

     कला, वाणिज्य, विज्ञान पांरपारिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि.४ डिसेंबर, २०२४ पासून सुरू होत आहेत.

       पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत  असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी परिपत्रका व्दारे  दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा