Breaking

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ.कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा*


भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक प्रकट वाचन : प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,अन्य मान्यवर व विद्यार्थी

मिसाईल मॅन, दिवंगत माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

   शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्र यांच्यामार्फत आयोजित वाचन प्रेरणा दिन उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या नियमावलीनुसार सकाळी १०.३० ते १०.४५ या वेळेत भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले.१०.४५ ते ११.०० या कालावधीत छ.शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे सामूहिक प्रकट वाचन करण्यात आले.

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. डी.एस. बामणे, आभार डॉ. महावीर बुरसे व सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी केले.

    यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.डॉ. नंदकुमार कदम, प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक-कर्मचारी, कॉलेजचे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

       व्यवस्थापन परिषदेचे डॉ. रघुनाथ ढमकले,एनएसएस संचालक डॉ. टी.एम. चौगुले व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन, प्रेरणा व सहकार्य लाभले.

       या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय यांच्यावतीने करण्यात आले. ग्रंथपाल प्रा. डी.एस. बामणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, डॉ. प्रभाकर माने, एन.एस.एस. प्रतिनिधी रोहन लाले, कॅम्पस अँबेसिडर वीर कडाळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा