Breaking

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

*श्री क्षेत्र रामलिंग व श्री अल्लम प्रभू डोंगर परिसराची राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाकडून प्लॅस्टिक संकलन व स्वच्छता मोहीम*


श्री क्षेत्र रामलिंग येथे स्वच्छता अभियान 

*प्रा.डॉ. महावीर बुरसे  : उपसंपादक*


हातकणंगले : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर व मा.श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय यांची  संयुक्तपणे श्री क्षेत्र रामलिंग व श्री क्षेत्र अल्लम प्रभू डोंगर परिसराची राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाकडून स्वच्छता व प्लॅस्टिक संकलन करण्यात आले.

     प्रारंभी स्वच्छताबाबत रॅली काढण्यात आली. यानंतर परिसर स्वच्छ कऱण्यात आला.शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी.एम. चौगले,प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी याचे मार्गदर्शन, प्रेरणा व सहकार्य लाभले. परिसरातील भाविक व ग्रामपंचायतीचे इतर सर्व घटकांनी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे व आयोजक महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले.

      याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल महाजन, डॉ. प्रभाकर माने,डॉ. खंडेराव खळदकर,एन.एस.एस. प्रतिनिधी रोहन लाले, सुकन्या कांबळे, साक्षी चौगुले, पूजा भाले, गडदे, वीर कडाळे, वैष्णवी पोतदार,साक्षी कांबळे व दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा