Breaking

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

*प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे म्हणजे संशोधन व शैक्षणिक गुणवत्तेचा मानबिंदू : प्रा.डॉ. अर्जुन महाडिक यांचे प्रतिपादन*

 

प्रा.डॉ. अनिलकुमार वावरे यांचा सत्कार करताना श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत चव्हाण, माजी प्राचार्य डॉ.पी.बी.कुलकर्णी व प्रा.डॉ. अर्जुन महाडिक


*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


इस्लामपूर : येथील श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या. व प्रा.डॉ. अर्जुन महाडिक मित्र परिवाराच्या वतीने साताराचे आदर्श शिक्षक, संशोधक, संवेदनशील प्राध्यापक डॉ. अनिलकुमार वावरे यांचा विशेष सत्कार गुरुवर्य प्राचार्य डॉ.जे.एस. कुलकर्णी सभागृहात संपन्न झाला.प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे यांनी सूयेक परिवार व मराठी अर्थशास्त्र परिषदेसाठी सर्व पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

     याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत चव्हाण, माजी प्राचार्य डॉ.जे. एस.पाटील, प्राचार्य डॉ. उल्हास माळकर, अर्थसंवाद चे संपादक प्रा.डॉ. राहुल म्होपरे, एन.एस.एसचे माजी संचालक प्रा. संजय ठिगळे,प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचा उलघडा वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या माध्यमातून व्यक्त  केला.

स्वागत व प्रास्ताविक करताना पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी प्राचार्य डॉ. पी.बी. कुलकर्णी 

      प्रारंभी श्री दत्त पतसंस्थेचे संस्थापक व माजी प्राचार्य डॉ.पी. बी. कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकेच्या माध्यमातून गुणगौरव सोहळा आयोजन करण्याचा हेतू स्पष्ट केला.तसेच डॉ.वावरे यांच्या सर्व घटकांना स्पर्श करणाऱ्या कार्यशैली बाबत विशेष कौतुक केले.

     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अर्जुन महाडिक म्हणाले, डॉ. अनिल कुमार वावरे म्हणजे संशोधन व शैक्षणिक गुणवत्तेचा मानबिंदू असून भविष्यात त्यांचं कार्य सर्व घटकांचे कल्याणत्मक  असणार आहे. याप्रसंगी त्यांनी डॉ. वावरे यांचा विद्यार्थी दशेपासूनचा  संघर्षमय प्रवासातील महत्त्वाच्या अनेक शैक्षणिक  बाबी अधोरेखित केला.डॉ.अनिलकुमार वावरे यांना शुभेच्छा दिल्या.

      प्रारंभी उपस्थित माजी प्राचार्य डॉ.पी.बी. कुलकर्णी व डॉ. श्रीकांत चव्हाण यांचे हस्ते डॉ. वावरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पतसंस्थेच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करणारे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. पतसंस्थेचे नितीन चपाटे यांनी सन्मानपत्र वाचन केले. 

    सत्कार ला उत्तर देताना डॉ. वावरे म्हणाले, माझे हे शैक्षणिक व सामाजिक कार्य हे गुरुजनांची  शिकवण व प्रेरणा, मातापित्यांच्या आशीर्वाद, मित्रांच्या खंबीर पाठिंबा व समस्त घटकांच्या अदृश्य प्रेरणेमुळे शक्य होत आहे. भविष्यात अर्थशास्त्र विषयाचे कार्यक्षेत्र, शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनात्मक कार्य वृद्धीगत करण्यासाठी सदैव लढत राहीन. कोणतीही संघटना एका व्यक्तीच्या पाठबळामुळे चालत नसून यासाठी सर्व घटकांची साथ असावी लागते. माझ्या यशाची गुरुकिल्ली अर्थात यशाचे मानकरी कालवश जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ.जे एफ.पाटील व प्रा.डॉ. अर्जुन महाडिक हे आहेत.

        मॅनेजिंग डायरेक्टर श्री. कबाडे यांनी आभार मानले. उत्तम सूत्रसंचालन सौ.सारिका कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम व नेटके नियोजन श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. 

      या कार्यक्रमास सुयेकचे विद्यमान अध्यक्ष प्रा.एम.जी.पाटील, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. बोदगिरे, सचिव/ कार्यवाहक प्रा.डॉ. संजय धोंडे, माजी सुयेक अध्यक्ष प्रा.डॉ. सुभाष दगडे, उपप्राचार्य प्रा.जे.एस.यादव, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. मनोहर कोरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. यशवंत हरताळे,प्रा.डॉ.हारुगडे , पतसंस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा