![]() |
भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद व डीन प्रा.पी.पी.पाटील व अन्य मान्यवर |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्रंथालय व आय. एस. टी. ई.विभाग यांच्यावतीने 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद होते.
१५ ऑक्टोंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. याच दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाकडून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांच्याही फोटोस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयाकडून आज पासून २१ ऑक्टोबर पर्यंत वाचन सप्ताह घोषित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी वाचन वृत्तीची वाढ व्हावी तसेच थोरामोठ्यांच्या साहित्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस फोटो पूजन, दीप प्रज्वलन नंतर प्रथमेश गोडसे, शंतनु अष्टेकर या विद्यार्थ्यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्थ थोरवत यांनी केले व आभार शमिश शेख या विद्यार्थ्यांने मांनले.
कार्यक्रमासाठी डीन डॉ.पी.पी. पाटील, डॉ. शुभांगी पाटील,वरिष्ठ ग्रंथपाल डी. आर. माने., एन.एस. एस. प्रोग्रॅम ऑफिसर, प्रा. पी. ए. चौगुले, प्रा. बी. एन. शिंदे, सर्व डिन्स,विभाग प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा