![]() |
श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय सैनिक टाकळी चा विशेष सन्मान करताना शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर व सोबत सर्व शिक्षक वृंद |
*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*
*नृसिंहवाडी : संपूर्ण देशभरात सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे सैनिक टाकळी आता शिक्षणाच्या विविध उपक्रमातून आपली ख्याती सर्व दूर पसरवीत आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील युवक हा देश सेवेसाठी नेहमीच अग्रेसर असतो, सोबतच या गावांमध्ये असणारे श्री छत्रपती विद्यालय सुद्धा आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून नावारूपास येत आहे*
येथील लोकशिक्षण मंडळ, सैनिक टाकळी संचलित छ. शिवाजी हायस्कूल सैनिक टाकळी या विद्यालयास दि. १८/०९/२०२४ रोजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री विश्वास सुतार व श्री डी.सी. कुंभार यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या दि. २४/०४/२०२४ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी आपण उत्कृष्टपणे केलेची दिसून आलेली आहे असे म्हणाले.सोबतच या विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी, माजी सैनिक तसेच उद्योगपती यांच्या सहकार्याने सर्व वर्ग इंटरऍक्टिव्ह पॅनेलसह डिजीटल बनविलेले आहेत. तसेच सौरउर्जा, बोअरवेल, शुध्द पेयजल, संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय अशा भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. अशा सुविधांसाठी जवळपास रक्कम रुपये ८५.०० लाख लोकसहभाग (CSR) मिळविलेला आहे.तसेच क्रीडा व स्पर्धा परीक्षांकडे यशस्वती वाटचाल करत आहेत.
मा.श्री. एकनाथ आंबोकर साहेब (शिक्षणाधिकारी माध्यमिक) जिल्हा परिषद,कोल्हापूर यांनी दखल घेऊन अभिनंदन व विशेष कौतुक केले.पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे शाळेच्या विकासात योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट कंपन्या व उद्योगपती यांचे सुद्धा आभार मानले.
या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विशेष कौतुकाचे सैनिक टाकळी सह परिसरामध्ये पालक शिक्षक व विद्यार्थी यांच्या मध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा