![]() |
मोदी हॉस्पिटलमध्ये जन आरोग्य योजनेचा शुभारंभ करताना डॉ. विजय राज मगदूम व एडवोकेट सोनाली मगदूम व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. आबासाहेब जाधव : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील डॉ.जे. जे. मगदूम होमिओपॅथी मेडिकल कॉलेज संचलित मोदी हॉस्पिटल मध्ये रुग्णसेवेसाठी 'महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा 'शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजयराज मगदूम, उपाध्यक्षा ऍड. सोनाली मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना मोफत आणि अल्प दरात परवडणारी आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य सरकारने ' महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' सुरू केलेली आहे सदर योजनेचा लाभ सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांना, आधार कार्ड, रेशन कार्ड कागदपत्राची पूर्तता करून घेता येतो. उपलब्ध साधनसामग्रीनुसार शस्त्रक्रिया, डोळ्याचे ऑपरेशन्स व इतर उपचारांसाठी पेशंट्सना याचा लाभ घेता येणार आहे.
स्वर्गीय डॉ.जे. जे. मगदूम यांनी सुरू केलेल्या आरोग्य सेवेचा वारसा ट्रस्टचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सक्षमपणे आज अखेर चालवत आहेत तथापि या शासकीय योजनेचा लाभही सर्वांनी घ्यावा असे आवाहन व्यवस्थापनाकडून नागरिकांना करण्यात आले.
योजनेविषयी अधिक माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक आरोग्य मित्र श्री. गौतम पाटील यांनी दिली.
स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील बन्ने यांनी केले. आभार उपप्राचार्या डॉ. गझाला सय्यद यांनी मानले. कार्यक्रमासाठी कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे,डॉ. शांता पाटील,डॉ. रियाझ अत्तार, डॉ. परवेज आत्तार आदि मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा