Breaking

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

*आगरच्या उपकार नगर मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न*

 

उत्कर्ष को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, आगर या ठिकाणी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करताना सर्व मान्यवर


*प्रा.डॉ. आबासाहेब जाधव : विशेष प्रतिनिधी


जयसिंगपूर : उत्कर्ष को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, आगर या संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मौजे आगर या ठिकाणी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती व्याख्यानाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते सुरभी पाटील व प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी मार्गदर्शन केले.

       प्रारंभी मा. सौ. सुरभी पाटील यांनी महिलांच्या असंख्य प्रश्नांना स्पर्श करीत आनंदी व सुखी जीवनाचा मूलमंत्र दिला.उद्योजिका बनण्यासाठी महिलांनी मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. टीव्हीवरच्या मालिकेमुळे कुटुंबात कलह निर्माण होतात. यापेक्षा सुखी कुटुंबासाठी सकारात्मक व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून उद्योजिका बना असेही त्या म्हणाल्या. 

        जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ. प्रभाकर माने मार्गदर्शन करताना म्हणाले, महात्मा गांधीचे तत्वज्ञान व कार्य भारतापुरता मर्यादित राहिले नसून त्याचा अखंड विश्वाला स्पर्श झालेला आहे.परिणाम स्वरूप जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये सत्य व अहिंसेच्या माध्यमातून शांततामय क्रांती झाली आहे. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, सरहद्द गांधी यांनी अनेक चळवळी यशस्वी करून दाखवल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गांधीजींच्या विचारामुळे माझ्यासारखा व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होऊ शकली हे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलून दाखवले. महात्मा गांधीजी यांची जयंती अर्थात २ ऑक्टोबर हा दिवस जागतिक पातळीवर अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज असून या माध्यमातूनच जागतिक शांतता प्रस्थापित होणार आहे हे सत्य स्वीकारलं पाहिजे. 

     देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन हेच एका दीपस्तंभा सारखे असून भारतीय नागरिकानात प्रेरणादायी आहे.साधी राहणी व उच्च विचारसरणी च्या माध्यमातून राजकारण स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. जय जवान- जय किसान या घोषवाक्याच्या माध्यमातून देशात कृषी  व देश प्रेमाची क्रांती घडवून आणली.

      अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा.  राजेंद्र येळगुडे साहेब म्हणाले, उत्कर्ष ही पतसंस्था नावाप्रमाणे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भविष्यात या पतसंस्थेची आर्थिक भरभराट होणार असून याचा निश्चित लाभ सभासदांना होणार याबाबत त्यांनी सकारात्मक अशा व्यक्त केली.

      प्रारंभी पाहुण्यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा गांधी व लालबुद्ध शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

   उत्कर्ष पतसंस्थेचे चेअरमन मा. अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक   केले. उत्कर्ष परिसर विकास मंचच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन भविष्यात ऑर्गन डोनेट बाबत मंच काम करणार असल्याचे मा. उत्तम सुतार सरांनी केला. सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे संस्थापक मा.महावीर पाटील यांनी संस्थेचा विकासाचा संक्षिप्त अहवाल मांडला. कार्यक्रमाचे आभार मा. सौ. पूजा बदामे मॅडम यांनी मानले.उत्तम सूत्रसंचालन सौ. उषा सुतार मॅडम यांनी केले.

      या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन उत्कर्ष विचार मंच व उपकार नगर मधील सर्व सक्रिय पदाधिकारी व सदस्यांनी केले.

      या उत्कर्ष को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   या कार्यक्रमांस कल्पदृम पतसंस्था हसूर चे संस्थापक चेअरमन नेमगोंडा पाटील, उत्कर्ष सोसायटीचे संचालक श्री. रावसाहेब शेट्टी, श्रीकांत जगनाडे, सुरज पाटील, अनिल सुतार, डॉ. आबासाहेब जाधव, सतीश आरसगोंडा,  विपीन खाडे, अशोक कुंभार, दादासो वाडकर व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा