Breaking

रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

*हातकणंगले रेल्वे स्टेशनची राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्याकडून स्वच्छता*


स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत हातकणंगले रेल्वे स्टेशनची स्वच्छता मोहीम

*प्रा.बाळगोंडा पाटील : उपसंपादक*


हातकणंगले : येथील मा.श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर यांनी संयुक्तपणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून 'स्वच्छता हीच सेवा' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत हातकणंगले येथील रेल्वे स्थानकाची राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक संकलन व स्वच्छता केली.

         हातकणंगले रेल्वे स्टेशन चे स्टेशन मॅनेजर पी.बी. देसाई यांनी उपस्थित सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली प्लॅटफॉर्मवर स्वच्छता जनजागृती बाबत जोरकस घोषणा देत रॅली काढण्यात आली.

       स्टेशन मॅनेजर पी.बी. देसाई यांनी स्वतः स्वच्छता करून प्लॅस्टिक संकलित केले. तसेच त्यांनी शासनाच्या उपक्रमाचा कौतुक करून शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे व आयोजक महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

      याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल महाजन, डॉ. प्रभाकर माने,डॉ. खंडेराव खळदकर,एन.एस.एस. प्रतिनिधी रोहन लाले, सुकन्या कांबळे, चौगुले, गडदे, वीर कडाळे व दोन्ही महाविद्यालयाचे  स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा