![]() |
डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग |
प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक
जयसिंगपूर : येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये ' रॅपिड एप्लीकेशन डेव्हलपमेंट विथ पायथॉन ' या विषयावरती कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सॉफ्टवेअर आर्किटेक्चर स्पेशालिस्ट प्रा. कृष्णकांत माने (KK) उपस्थित होते.
प्रा. कृष्णकांत हे एक दूरदर्शी कार्पोरेट क्षेत्रातील उद्योजक आहेत. आशियातील पहिले पूर्णपणे अंध सॉफ्टवेअर अभियंता व आयटी प्रोफेशनल म्हणून 2003 झाली त्यांना गणले गेले. ७५००० हून अधिक अनुदान रोजगार मिळवून देणारे कृष्णकांत हे सॉफ्टवेअर प्रणेते आहेत.'डोळ्यापेक्षा दृष्टी महत्त्वाची'असे त्यांचे मत आहे. २०२२ मध्ये इकॉनॉमिक टाइम्स कडून 'चॅलेंज एंटरप्रेन्योर ऑफ द इयर' फिनटेक श्रेणीतील प्रॉपर टेक सी एक्स ओ ऑफ द इयर व प्रतिष्ठित हेलन केलर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये ' पायथन ' या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर आणि वापरा विषयी फायदे त्यांनी मुलांना सांगितले. एप्लीकेशन डेव्हलप करणे, पायथन बेसिक समजावून घेणे, इंडस्ट्रीमध्ये वापरा विषयी माहिती, डेटाबेस डिझाईन करणे व सेटअप करण्याविषयी माहिती सांगितली गेली. पायथन वापरामध्ये वापरण्यात येणाऱ्या फ्रेमवर्कची माहिती दिली, रेस्ट एपीआय आणि मायक्रो सर्विसेस समजून सांगितल्या, प्रोजेक्ट कन्सेप्ट व मॅनेजमेंट याविषयी सखोल माहिती दिली तसेच डॉक्युमेंटेशन आणि डेटा स्यापलिंग ऑटोमेशन इत्यादी वरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. कृष्णकांत माने हे अंध असून विचाराची दृष्टी असणारे आहेत आणि तो आदर्श आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर असावा या दृष्टिकोनातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आय.टी. विभागाचे विभाग प्रमुख प्रा. राजेश भारतीय व ए. आ. डी. एस. विभागाचे प्रा. आदित्य मगदूम यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा