![]() |
मा. संजय दामोदर माने, विशेष लेखापरीक्षक,सोनी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
मिरज : सोनी येथील संजय दामोदर माने यांना महाराष्ट्र शासनाच्या सहकार ,पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून "विशेष लेखापरीक्षक " सहकारी संस्था वर्ग दोन- राजपत्रित अधिकारी ,पणन विभाग ,सांगली येथे पदोन्नती मिळाली आहे.यापूर्वी माने यांनी जि. मध्य. सह. बँक, सांगली ,पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य विभाग सांगली, सह. साखर कारखाना विभाग ,सांगली तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षक सांगली या विभागाकडे त्यांनी उत्कृष्ट कामकाज केले आहे. मा.माने यांची काम करण्याची विशेष हातोटी असल्याने त्यांचा त्याच्या खात्यात विशेष नावलौकिक आहे.
संजय माने यांच्या पदोन्नती बद्दल विभागीय सहनिबंधक सह. संस्था लेखापरीक्षण, कोल्हापूरचे दिलीप छत्रीकर, सांगली जि. सह.उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सांगलीचे संजय पाटील ,अमरावतीचे माजी विभागीय सहनिबंधक हर्षवर्धन चव्हाण ,कोल्हापूर जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण सिंह पाटील, सांगलीचे विशेष लेखापरीक्षक पैलवान ,गोसावी, राणे व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून मनस्वी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा