![]() |
वजीर रेस्क्यू फोर्सचा सन्मान करताना धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार व अन्य मान्यवर |
प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक
कोल्हापूर : सार्वजनिक न्यास कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने उत्कृष्ट कार्य केलेल्या न्यासांचा प्रोत्साहन पर सन्मान करण्यात येतो.कोल्हापूर विभागामध्ये येणाऱ्या न्यासामधील विशेष सामाजिक उत्कृष्ट कार्य केलेल्या वजीर रेस्क्यू फोर्सचा शुक्रवार दि 25/10/24 रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, धर्मादाय आयुक्त शरद वाळके उपआयुक्त सौ जाधव मॅडम, यास सर्व अधिकारी वर्ग विविध न्यासांचे प्रमुख उपस्थित होते.
या सन्मानानंतर वजीर रेस्क्यू फोर्सचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल रउफ पटेल यानी आम्हास त्याच्या कार्याची माहिती दिली यांचे सामाजिक कार्य हे 2005 च्या महापुरापासून सुरू झाले . या महापुरात त्यांनी जवळपास 15 हजार लोकांचे स्थलांतर यांनी या संघटने मार्फत केले .2019 च्या महापुरात 8732 लोकांचे स्थलांतर व 2021 च्या व महापुरात 310000 लोकांचे स्थलांतर व 2024 च्या महापूरात 17 गांवाचा पाणी परवठा आठ दिवस बंद आसलेला चालू करुण देण्यात आले व तसेच बस्तवाड आकीवाट दुर्घटना मध्ये 8 जण वाहून घेले त्याती 6 लोकांना जीवदान दाले व दोन पैकी एक मृतदेह काडून पोलीसांच्या स्वाधिन केले व एक बेपता आहे हे या वजीर रेस्क्यू फोर्स मार्फत करण्यात आले आहे . या संपूर्ण महापुरात एकूण 517 लोकांचे जीव हे वाचवले आहेत म्हणजे त्यांना बुडण्यापासून वाचवले आहे , या फोर्स मध्ये 49 स्वयंसेवक हे युवकांना आपत्ती व्यवस्थापन संबंधी प्रशिक्षित सुद्धा करतात यामध्ये सद्य स्थितीला शिरोळ तालुक्यात 346 स्वयंसेवक व संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात 850 स्वयंसेवक हे नेहमी सदैव सेवेस कार्यरत असतात .
या फोर्स मार्फत आजपर्यंत 9008 मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे त्याचप्रमाणे 2020 व 2021 च्या कोरोना काळात या स्वयंमसेवकांनी जीवाची पर्वा न करता लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केले आहे ,तसेच सर्व कोरोना काळात लोकांना नियम पाळण्यासाठी जागरूक करण्याचे काम ही फोर्स करत होती , सर्व चेक पॉईंट्स वर पोलिस , होमगार्डस सोबत मदत करत होते.व तसेच पंढरपूर येथे 2020 साला पासून आज पर्यंत 500 हुन आधिक भाविकांना जीवदान दिला आहे व 96 मृतदेह चद्रभागा नदातून काडून पोलीसांच्या स्वाधिन केले आहे
याच्या कार्यची दखल ही आंतरराष्ट्रीय न्युज ने सुद्धा घेतली आहे या मध्ये साऊथ आफ्रिका देशातील न्यू फ्रेम या मीडियाने तसेच ऑस्ट्रेलिया मधील मीडियाने सुद्धा घेतली आहे.प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ठिकाणी लोकांना शिस्त , सामाजिक अंतर , मास्कचे महत्व व पालन करण्यासाठी तत्पर असतात .
2024 च्या महापुरामध्ये अकिवाट येथे घडलेल्या दुर्घटनेमध्ये महापुरात बुडालेल्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी सर्वात पुढे आमची रेस्क्यू फोर्स होती.यामुळेच हा सन्मान आम्हाला प्राप्त झाला.
या पुरस्काराने पुन्हा काम करण्याची ऊर्जा प्राप्त होईल असे मत वजीर रेस्क्यू फोर्सच्या अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा