Breaking

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

*डॉ.जे. जे.मगदूम इंजिनिअरिंगच्या शंतनु अष्टेकरची संशोधनात भरारी*

 

शंतनु अष्टेकर, डॉ.जे.जे.मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज, जयसिंगपूर 


*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*


   जयसिंगपूर  : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन विभागातील द्वितीय वर्षामध्ये शिकत असलेला शंतनु अष्टेकर या विद्यार्थ्याचे एक युटिलिटी पेटंट फाईल झाले व इंटरनॅशनल जनरल ऑफ नॉव्हेल  'रिसर्च अँड डेव्हलपमेंट '(IJNRD ) या इंटरनॅशनल जर्नलमध्ये पेपर प्रकाशित झाला आहे.शाळा महाविद्यालयांमध्ये वापरात येणारे चॉक बोर्ड डस्टर या वरती या विद्यार्थ्याने"ॲडव्हान्स चॉक बोर्ड डस्टर विथ इंटिग्रेटेड डस्ट एक्सट्रॅक्शन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी " या शीर्षकाखाली आपले युटिलिटी पेटंट फाईल केले आहे. ब्लॅक बोर्ड पुसत असताना वापरल्या जाणाऱ्या खडूच्या डस्ट/धूळीमुळे बऱ्याच शिक्षकांना सायनसचा त्रास होत होता. बोर्ड पुसण्यासाठी या डस्टर चा  वापर केला असता डस्टर मध्येच धूळ साचून ठेवून खडूच्या धुळीपासून परत खडूची निर्मिती आपण करू शकतो.'वेस्ट इज बेस्ट'आपल्याला करता येईल असा या संशोधनाचा हेतू आहे .    

      तसेच आय. जे. एन. आर.डी. या इंटरनॅशनल जर्नल मध्ये  " स्मार्ट वायरलेस स्विच बोर्ड युजिंग मोबाईल ॲप " या शीर्षकाखाली शंतनुने एक पेपर प्रकाशित केला आहे. घरातील किंवा ऑफिस मधील स्विच बोर्ड कंट्रोल करण्या करिता रेग्युलर बटनचा वापर न करता मोबाईल द्वारे ब्लूटूथ ने स्विच  बोर्ड कंट्रोल करता येतो. असा या संशोधनाचा हेतू आहे.

       महाविद्यालयातील रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन डॉ. डी. बी. देसाई व विभाग प्रमुख प्रा.एम. एम. कोलप यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यास मिळाले. तसेच जरनल पेपर साठी प्रा. अरिफ शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

      ट्रस्टचे  चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हॉइस चेअर पर्सन ॲड.डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे व प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद यांनी शंतनूस भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा