![]() |
स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ७ ऑक्टोबर, २०२४ रोजी 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमांतर्गत प्लॅस्टिकचे मोठ्या प्रमाणात संकलन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी.एम. चौगले व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविण्यात आला. जयसिंगपूर कॉलेज कॅम्पस मध्ये ३ दिवशीय शिरोळ तालुका शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे कॉलेज कॅम्पस मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे बॉटल, विविध खाद्यपदार्थाचे रॅपर्स व अन्य स्वरूपातील प्लॅस्टिक सर्वत्र पसरलं होते. ते स्वच्छ करण्यासाठी एन.एस.एस. विभागाने पुढाकार घेतला.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, डॉ. प्रभाकर माने, एन.एस.एस. प्रतिनिधी रोहन लाले, कॅम्पस अम्बिसिडर वीर कडाळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा