Breaking

रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

*राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत जयसिंगपूरातील बुद्ध विहार परिसरात स्वच्छता अभियान*


श्रीमती घोडावत कन्या महाविद्यालयाच्या वतीने बुद्ध विहारात स्वच्छता अभियान


*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*


जयसिंगपूर: लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार मंडळ,जयसिंगपूर या ठिकाणी परिसर स्वच्छता करण्यात आली. 

   याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक ,अध्यक्ष ,बुद्ध विहार जयसिंगपूर यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी नालंदा वाचनालयात घडलेले प्रशासकीय अधिकारी व स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थिनींनी बुद्ध विहार परिसराची स्वच्छता केली .बुद्ध विहार, जयसिंगपूर मार्फत विद्यार्थिनींना अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले होते.

    सदर कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.  पंडित वाघमारे व प्रा. डॉ. संदीप रावळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य प्रोफेसर डॉ. विकास मिणचेकर यांचे सहकार्य लाभले.  कार्यक्रमाचे आभार प्रा. सुरेश भाटिया यांनी मानले.

      या स्वच्छता उपक्रमाचे बौद्ध समाजाकडून कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा