Breaking

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

कोल्हापूर - उचगाव येथील युवक पै.धनंजय भोसले व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर यांच्या जागरुकतेमुळे ऊसतोड मजूर जोडप्याच्या चिमुकल्या मुलीला जटनिर्मुलणामुळे मिळाले नवीन जीवन.

 

चिमुकलीचे जट निर्मूलन केल्यानंतर आनंदात नाहून निघालेले कुटुंब

जट अवस्थेत असताना धनंजय भोसले यांनी घेतलेला चिमुकलीचा फोटो 


मालोजीराव माने, कार्यकारी संपादक.

       कोल्हापूर - उचगाव येथील जागरूक युवक पै. धनंजय भोसले व महाराष्ट्र अंनिस कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे यांच्या पुढाकारने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी नंदुरबार भागातून आलेल्या ऊस तोडणी कामगार कुटुंबातील एका अडीच वर्षांच्या बालिकेचे जटा निर्मूलन केले. ज्या महामानवाने आपल्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले त्याच्या स्मृतीदिनी एका बालिकेच्या शिक्षणाचा आणि जीवनाचाही मार्ग सुखकर केल्याचे समाधान आहे. रामदास देसाई, मोहित पोवार, राजवैभव शोभा रामचंद्र, कृष्णात स्वाती यांच्या उपस्थितीत हे जटा निर्मूलन पार पडले. 

अंधश्रद्धा निर्मुलन समिती, कोल्हापूर , व उजवीकडून दुसरे धनंजय भोसले 

       धनंजय भोसले या जागरूक युवकाला उसाची वैरण आणायला गेले असताना तेथे ही चिमुकली या जटाच्या अवस्थेत दिसली. तेव्हा त्यांनी या मुलीबद्दल तिच्या पालकांशी चर्चा केली, त्यांना जट काढून टाकण्यासाठी व मुलीची स्वच्छता राखण्यासंबंधी समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तिचे पालक देवीचा कोप होईल व जट काढली तर १०० मुले मरतील अशा अंधश्रद्धेच्या भितिखाली दबले असल्याची जाणीव झाली. जेव्हा धनंजयना कळाले की काही दिवसांनी त्या चिमुकल्या मुलीला देवीला सोडण्यात येणार आहे तेव्हा धनंजय मधील बाप जागा झाला व काहीही करून त्या चिमुकलीला अंधश्रध्देचा बळी होऊन द्यायचा नाही हे ठरविले. त्यांनी त्या कामगार दाम्पत्याचा पत्ता वगैरे माहिती घेतली.


जट निर्मूलन करतानाचा व्हिडिओ

     त्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र महाराष्ट्र अंनिस कार्यकर्ते जयसिंगपूर येथील मालोजीराव माने यांना संपर्क करून या बालिकेच्या जटांविषयी माहिती दिली. मालोजीराव माने यांनी कोल्हापुर येथील कार्यकर्त्यांना संपर्क करून संबंधित मुलीबद्दल सांगितल्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त्यांनी धनंजय भोसले यांच्या मदतीने या ऊस तोडणी कामगारांच्या पालावर जाऊन त्या बालिकेच्या पालकांचे प्रबोधन केले आणि त्यांना विश्वासात घेऊन त्या चिमुकलीचे जटा निर्मूलन पार पाडले. 

      यासाठी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विनायक सावळे आणि सामाजिक कार्यकर्त्या रंजना पावरा यांनी संबंधित कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधून त्यांचे उद्बोधन केले तसेच युवक धनंजय भोसले यांचेही कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा