![]() |
मार्गदर्शन करताना डॉ. खंडेराव खळदकर, अध्यक्षस्थानी डॉ. एन एल कदम, प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, प्रा. भारत आलदर व डॉ. महावीर बुरसे |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये भारतीय संविधान मंजुरीचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी संविधान साप्ताहिक उपक्रमाच्या निमित्ताने 'भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख वक्ते डॉ. के.डी.खळदकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.एन. एल.कदम होते. प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले व प्रा. भारत आलदर होते.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख व वक्ते डॉ. खंडेराव खळदकर मार्गदर्शन करताना म्हणाले,भारतीय संविधानाला मंजुरी अर्थात लोकशाहीच्या नव्या युगाचा प्रारंभ झाल्या असल्याने गेल्या ७५ वर्षात २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. ज्याद्वारे भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकांच्या हक्कांचे रक्षण, सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी तयार केलेले एक व्यापक दस्तऐवज बनले आहे. त्यामुळे सामाजिक न्याय ही संविधानाची महत्त्वाची भूमिका आहे जी विविध कलमाद्वारे स्पष्ट होत आहे.
डॉ. खळदकर यांनी संविधानातील सामाजिक न्यायाच्या अनेक तरतुदी व विविध कलमाद्वारे स्पष्ट केल्या. सामाजिक न्यायासाठी शैक्षणिक व आर्थिक विकास, महिलांचे सशक्तिकरण व आदिवासी हक्क यावर प्रकाश टाकला. सरते शेवटी ते म्हणाले, सामाजिक न्यायाच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत असतात जे दूर करण्यासाठी शासनाने कठोर कायदे जनजागृती व प्रभावी अंमलबजावणी यावर भर द्यावा.
अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना उपप्राचार्य डॉ. नंदकुमार कदम म्हणाले, भारतीय संविधान हे सामाजिक न्यायासाठी एक मार्गदर्शक दस्तऐवज आहे. देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी सर्व घटकांना समाविष्ट करणे गरजेचे आहे, आणि संविधानाच्या तत्वावर आधारित समाज निर्माण करणे हीच खरी लोकशाही आहे.
उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी.एम.चौगले व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक ए.बी. कांबळे, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक व कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा