![]() |
दानोळीत धारदार शस्त्राने खून |
जयसिंगपूर : दानोळी येथील संतोष शांतिनाथ नाईक वय वर्ष ३६ असे तरुणाचे नाव असून त्याचा धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
या विषयी अधिकृत माहिती अशी की, येथील गैबीसाहेब दर्गा मैदानात तरुणाचा मृतदेह आढळून आला. या बाबतची माहिती पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांना जयसिंगपूर पोलीस ठाणेस कळवली. दरम्यान मध्यरात्री २.०० वाजता जयसिंगपूर पोलिसांनी घटनस्थळी भेट दिली. यावेळी इंचलकरंजी डि.वाय.एस.पी समिरसिंह साळवी व पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. सदरच्या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. खून नेमका कोणी व का केला या बद्दलची अद्यापही माहिती मिळू शकली नाही. जयसिंगपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा