जयसिंगपूर - जयसिंगपूर, ता .शिरोळ येथील गल्ली नंबर १ येथील संत गोरोबा कुंभार मंदिराच्या आवारात दुपारच्या सुमारास भला मोठा अजगर आढळला. स्थानिकांनी प्राणीमित्र हनमंत न्हावी व ओकार कुलकर्णी यांना कळवल्यानंतर त्यांनी तात्काळ घटना स्थळी जाऊन त्याला पकडले.
हा अजगर सुमारे १३ फूट लांबीचा असून त्याला वन्यजीव संरक्षण पथकाचे प्रमुख प्रदिप सुतार यांच्या स्वाधीन करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले गेले.
शिरोळ तालुक्यात प्रथमच अजगर साप आढळल्याने सर्व नागरिक व प्राणीमित्र यांच्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच हा अजगर येथे कसा आला? अपघाती आला आहे का? तसेच बऱ्याच दिवसांपासून असेल तर त्याचा अधिवास निर्माण झाला आहे का ? या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.
तसेच प्राणीमित्र हणमंत व ओंकार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच हा साप बिनविषारी असल्यामुळे व मनुष्यावर नाहक हल्ला न करणारा असल्याने जास्त घाबरण्याचे कारण नाही असा दिलासाही दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा