![]() |
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव |
*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*
श्री क्षेत्र नृसिंहवाडी : येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. गुरुनानक जयंतीची सुट्टी असलेने श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात भाविकांनी व दत्त देव संस्थानने कृष्णाकाठी लावलेल्या असंख्य दिव्याने मंदिर परिसर उजाळून निघाला.
पौर्णिमा व सुट्टी असलेने हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी व कार्तिक पौर्णिमा स्नानासाठी गर्दी केली. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात मंदिर परिसरात दत्त देव संस्थानने व भाविकांनी कृष्णा-पंचगंगा काठावर लावलेल्या असंख्य दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला.
पौर्णिमेनिमित्य येथील मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी आठ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी साडेबारा वाजता श्रींचा चरणकमलावर महापूजा, तीन वाजता पवमान पंचसूक्त पठण, रात्रो साडे आठ वाजता धूप, दिप, आरती व पालखी सोहळा होवून शेजारती असे कार्यक्रम झाले.
दत्त दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविक पायी, दुचाकी, चारचाकी वाहनाने श्रींच्या दर्शनासाठी येत होते.भाविकांनी कृष्णा काठची काकडी, वांगी तसेच पेढे, बर्फी, मेवा-मिठाई खरेदी साठी गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत दीपोत्सव व भाविकांची वर्दळ चालू होती. ग्रामपंचायत व श्री दत्त देव संस्थान मार्फत भाविक व यात्रेकरूंसाठी विविध सोयी व सुविधा उपलब्ध करून देणेत आल्या होत्या. पोलिस यंत्रणेकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा