![]() |
भव्य मानवी साखळी व रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व घटक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : आज दिनांक १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूरच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी क्रांती चौकात भव्य मानवी साखळी व रॅलीचे आयोजन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने १०० टक्के मतदान व्हावे यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचेकडून मतदान जनजागृती साठी विविध उपक्रम राबविण्याच्या सुचना देण्यात आलेले आहेत. या अंतर्गत दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी जयसिंगपूर नगरपरिषदे मार्फत भव्य मानवी साखळी करुन मतदारांना मतदान करणे बाबत प्रोत्साहित करण्याचा व प्रबोधन रॅलीचा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
सदर उपक्रमात जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, जनतारा हायस्कूलचे विद्यार्थी व नवजीवन हायस्कूल, जयसिंगपूरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही विद्यार्थ्यांनी हातामध्ये मतदारांना प्रोत्साहित करणारे प्रबोधनात्मक फलक धरले होते. तर इतर सर्व विद्यार्थ्यांनी भव्य मानवी साखळी करून हा उपक्रम राबविला. यानंतर सदर रॅलीला क्रांती चौकातून स्टेशन रोड मार्गे गांधी चौक ते पुन्हा दुसऱ्या मार्गे क्रांती चौकात या रॅलीचे समापन झाले. या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रबोधन करणारे फलक हातात घेऊन मतदान जनजागृतीच्या जोरकस घोषणा देत या रॅलीचे मार्गक्रमण पुढच्या दिशेने होत होते.
जयसिंगपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. टीना गवळी यांच्या मार्गदर्शनानुसार अनिरुद्ध महाजन व त्यांच्या टीमने उत्तम आयोजन केले. या रॅलीत एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, डॉ. प्रभाकर माने व चेतन कांबळे सर यांचा सहभाग होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा