Breaking

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

*प्रा. के बी पाटील यांचे दातृत्व ; दक्षिण भारत जैन सभेस केली आर्थिक मदत*

 

प्रा.कुमार बी.पाटील यांचा सत्कार करताना सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील सेवानिवृत्त उप प्राचार्य प्रा. के बी पाटील यांनी  दक्षिण भारत जैन सभेस ₹ २५०००/-  प. पू. १०८ आचार्य श्री विद्यासागर जी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालयासाठी  ₹११,१११/- आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी  जपली आहे.

     प्रा. पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या शिष्यवृत्ती विभागास ₹ २५०००/- चा धनादेश सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील यांनी शिष्यवृत्ती विभागाशी सांगोपांग माहिती दिली.

        तसेच माय स्कूल जवळील नव्याने निर्माण होणाऱ्या प. पू. १०८ आचार्य श्री विद्यासागर जी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालयच्या बांधकामासाठी ₹११,१११/- चा धनादेश देत आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.

     प्रा.कुमार पाटील हे मुळात धार्मिक वृत्तीचे,विद्यार्थी प्रिय व संवेदनशील स्वभावाचे असल्याने कॉलेज जीवनापासून त्यांनी आपल्या परीने आर्थिक व इतर प्रकारची मदत करीत असे. प्राध्यापक पेशा सांभाळताना गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तक, प्रवेश शुल्क,परीक्षा शुल्क, कपडे व अन्य प्रकारे मदत करीत असे.प्रा. पाटील हे दिलदार स्वभावाचे असल्याने कधीही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व घटकांना त्यांनी यथावकाश मदत केली आहे.प्रा. पाटील यांनी गरीब व हुशार पाच विद्यार्थ्यांना  दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. आज ते पाच विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.प्रा. पाटील हे अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व कृष्णामाई पतसंस्थेचे संचालक म्हणून ते सेवा बजावीत आहेत.या वित्तीय व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजाशी नाळ जोडत त्यांना महापूर, कोरोना महामारी व अन्य आपत्ती काळात वस्तूगत व आर्थिक मदत केली आहे. या प्रसंगी माजी प्राचार्य प्रा. बापट, आप्पासाहेब रायनाडे, चिरंजीव किरण पाटील, स्नुषा स्मिता पाटील, अभय बिरनाळे व रवी बिरनाळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा