![]() |
भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करताना |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : आज मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर,२०२४ रोजी येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये भारतीय संविधान मंजुरी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन सामूहिकरीत्या करण्यात आले. तसेच एन.एस.एस.च्या वतीने संविधान जागृतीसाठी संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जयसिंगपूर नगरपरिषद व भारतीय संविधान गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संविधानाच्या कार्यक्रमात ही विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
प्रारंभी प्रा.डॉ. खंडेराव खळदकर यांनी संविधान मंजुरी दिनाच्या संदर्भात प्राथमिक माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी संविधान उद्देशिकेचे क्रमशः वाचन केले. यावेळी उपस्थित असणारे प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी ही सामूहिक वाचन केले.
![]() |
प्रा.डॉ.आर.डी.माने यांच्यावतीने संविधान पुस्तिका सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.कदम यांना प्रदान करताना व अन्य मान्यवर |
याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे , उपप्राचार्य डॉ.एन. एल.कदम, उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, नॅक कॉर्डिनेटर प्रा.डॉ. तुषार घाटगे, कार्यालयीन अधीक्षक ए.बी.कांबळे, लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व सेवक , एन.सी.सी. कॅडेट्स व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा