![]() |
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बक्षीस वितरित करताना प्रा. संजय पाटील व सर्व मान्यवर |
*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*
कुरुंदवाड : येथील सहकारभूषण एस. के .पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड येथे ज्युनियर विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ शेख यांनी उपस्थितांचे स्वागत करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रमुख पाहुण प्रा.संजय पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, सकारात्मकतेने परिसरातील चांगल्या-वाईट घटनांचा उहापोह करीत यशस्वी व सक्षम नागरिक घडवण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक भान असणे ही काळाची गरज आहे, हा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.रमाकांत साठे यांनी वेळेचे महत्त्व विशद करून वस्तूंचे गुलाम होऊ नका, शिक्षकच समाजाला वाचवू शकतात, असे मत व्यक्त केले.
कॉलेजच्या सर्व शाखांमधील बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील तीन खेळाडू यामध्ये वेटलिफ्टिंग, कुस्ती, कराटे , तसेच राज्यस्तरावरील, विभागीयस्तरावरील, जिल्हास्तरावरील आणि तालुका स्तरावरील खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वर्षभरामध्ये विविध उपक्रमांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धेमधील खोखो, कबड्डी , हॉलीबॉल , गोळाफेक , थाळीफेक, लांब उडी , रनिंग या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाचे व खेळाडूंचाही सत्कार या निमित्ताने करण्यात आला. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, जयराम बापू पाटील, सर्व संचालक , महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.कदम, उपप्राचार्य व ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक , पालक वर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.अनिल पाटोळे यांनी केले. आभार प्रा. अमित जाधव यांनी मानले.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा