![]() |
कालवश श्रीमती कृष्णाबाई आप्पासाहेब पाटील |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : सहकारमहर्षी, उद्यान पंडित व कृषिरत्न मा. गणपतराव (दादा) आप्पासाहेब पाटील यांना मातृशोक झाला आहे.काल दिनांक ३० डिसेंबर, २०२४ रोजी त्यांच्या मातोश्री कालवश श्रीमती कृष्णाबाई आप्पासाहेब पाटील यांचे पहाटे देह वासन झाले. मृत्यूनंतर सकाळी ८.०० वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले होते. मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प केले असल्याने त्यांचे शरीर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल साठी दान केले आहे. या अगोदर त्यांचे पती सहकारमहर्षी डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांनी ही १ एप्रिल २०१५ रोजी देहदान केले होते.
श्री दत्त उद्योग समूहाच्या या पाटील परिवाराने हयात असतानाही सामाजिक बांधिलकी व जबाबदारीचे जान ठेवून हजारो घटकांना मदत केली होती. मृत्यूनंतरही या कुटुंबीयांनी देहदानाच्या माध्यमातून सामाजिक संवेदनशीलता व मानवतावादी दृष्टिकोन जोपासला आहे. उद्यानपंडित गणपतराव दादा पाटील यांनी मातोश्रींचा इच्छेनुसार काल मृत्यूनंतर देहदान करून संकल्प पूर्ण केला आहे
देहदान म्हणजे मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी दान करणे, ज्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीर रचनेचे सखोल ज्ञान मिळते आणि संशोधकांना नवीन उपचार पद्धती विकसित करण्यास मदत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा