Breaking

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

*संविधान निर्मितीचा सुवर्ण क्षण ऐतिहासिक चित्रफीतिच्या माध्यमातून उजेडात : प्राचार्य डॉ. सुरत मांजरे*

 

संविधान निर्मिती चित्रफित सादरीकरण प्रसंगी


*प्रा. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : भारतीय राज्यघटनेची निर्मिती हा देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या ऐतिहासिक प्रक्रियेचे दस्तावेजीकरण करणारी एक दुर्मीळ चित्रफितीच्या माध्यमातून संविधान निर्मिती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर प्रकाश टाकते असते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी भारतीय संविधान निर्मिती चित्रफीत सादरीकरण कार्यक्रम प्रसंगी केले. आज मंगळवार दि.३ डिसेंबर, २०२४ रोजी चित्रफीत सादरीकरण कार्यक्रम कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाला.उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले प्रमुख उपस्थित होत्या.

    डॉ. मांजरे पुढे म्हणाले,  या चित्रफितीच्या माध्यमातून भारताच्या संविधान सभेच्या बैठकींचे दृश्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या नेत्यांच्या भूमिका, तसेच संविधान लेखनाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अन्य महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य दर्शवते.या चित्रफितीतील काही दृश्ये संविधानाच्या अंतिम मसुद्यावर झालेल्या चर्चांचेही दस्तऐवज आहे.

      कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावर बोलताना उपप्राचार्य प्रा. भारत आलदर म्हणाले, सध्याच्या सरकारनेही या ऐतिहासिक सामग्रीच्या जतन आणि प्रसारासाठी प्रयत्न केले आहेत. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ही चित्रफीत दाखवून संविधान निर्मितीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे.भारतीय राज्यघटनेचा हा दस्तऐवज पाहताना देशवासीयांना संविधान निर्मितीच्या त्या कठीण, पण ऐतिहासिक काळाचे सजीव दर्शन घडले. संविधानाच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या चित्रफितीचा उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.

      प्रारंभी भारतीय संविधान उद्देशिका व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा.मुकुंद पारिशवाड यांनी केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केल. आभार पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.

    या कार्यक्रमास प्रा.ऐनापुरे, प्रा. कल्पना पाटील,प्रा. बाळगोंडा पाटील,प्रा. अमोल पवार,प्रा. बडबडे, प्रा.सुरज चौगुले व एन. एस.एस.प्रतिनिधी रोहन लाले उपस्थित होते.सीनियर व ज्युनिअर राष्ट्रीय सेवा योजने विभागातील स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

    खऱ्या अर्थाने देशाच्या युवा पिढीसाठी ही चित्रफीत एक प्रेरणादायी दस्तऐवज ठरणार आहे, अशी आशा या चित्रफितीच्या माध्यमातून निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा