![]() |
जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये विज्ञान कार्यशाळा |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये दिनांक ०५ ते ०७ डिसेंबर २०२४ रोजी विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. शिरोळ तालुक्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी या कार्यशाळेचा लाभ मिळणार आहे. या कार्यशाळेचे आयोजन दरवर्षी कॉलेजमध्ये करण्यात येते. या तीन दिवसीय कार्यशाळे मध्ये विद्यार्थ्यांना विषयतज्ञांचे मार्गदर्शन तसेच विज्ञान विषया संदर्भात प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच यासाठी सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. या संदर्भात कार्यशाळेचे समन्वयक प्रा.ए.टी. ऐनापुरे यांनी ही माहिती दिली.
या विज्ञान कार्यशाळेस उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त माहिती व ज्ञानाचा लाभ घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा