Breaking

मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

*जयसिंगपुरात १५ डिसेंबर रोजी ३४ वी अखिल भारतीय बौध्द धम्म महापरिषदेचे आयोजन*

 

३४ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषद


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौध्द संस्कार मंडळ (रजि.) जयसिंगपूर. ता. शिरोळ, जि. कोल्हापूर आयोजित ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषदेस सर्व अबालवृद्धांनी, उपासक/उपासिकांनी, बहुजनांनी उपस्थित राहून सक्रीय सहभाग घेऊन, तथागत बुध्दांच्या धम्मात समर्पित होण्याचे आग्रहाची विनंती केली आहे.

    धम्म परिषदेचे अध्यक्ष व उद्घाटक पूज्य भदन्त डॉ. उपगुप्तजी महास्थवीर (पुर्णा-परभणी)(सचिव, अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा महाराष्ट्र राज्य), पूज्य भदन्त प्रा.डॉ. यशकश्यपायन महास्थवीर (धम्म मार्गदर्शक, जयसिंगपूर),पूज्य भदन्त प्रा.डॉ.एम्. सत्यपाल महास्थवीर (पाली भाषा विभाग प्रमुख, मिलींद कॉलेज, छ. संभाजीनगर), पूज्य भदन्त करूणानंद स्थवीर (छ. संभाजीनगर) पूज्य भदन्त प्रज्ञाशिल महास्थवीर(मा. महासचिव महाबोधी महाविहार, बुध्दगया),पूज्य भदन्त संबोधी (वसगडे कोल्हापूर), पूज्य भदन्त आर. आनंद स्थवीर (वसगडे, कोल्हापूर),पूज्य भिक्खूणी माताजी बुध्दकन्याजी थेरी (छ. संभाजीनगर),पूज्य भिक्खूणी माताजी धम्मचारीणी थेरी (सोलापूर) हे पूज्य भिक्खू संघाची उपस्थित राहणार आहे.

वार आणि वेळ : मार्गशीर्ष पौर्णिमा रविवार दि. १५/१२/२०२४ सकाळी ९ ते सायं. ६

ठिकाण : वैशाली बुध्द विहार, लुंबिनीवन, धम्मनगर, जयसिंगपूर. ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. (महाराष्ट्र)

 कार्यक्रम : सकाळी १०.०० वा. धम्म ध्वजारोहण व पू. भिक्खू संघास भोजन दान. * दुपारी १२ ते ६ भिक्खू संघाची धम्मदेसना

 अधिक संपर्क : (02322) 221391, * मोबाईल नं.: 9423765386, 9421114041, 9423858037, 9405038320

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा