![]() |
प्रा. संदीप पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार |
*प्रा.चिदानंद अळोळी : उपसंपादक*
जयसिंगपूर: यंदाचा राज्यस्तरीय पुरस्काराचा मान जयसिंगपूर च्या प्रा.संदीप निरंजन पाटील यांना कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत चा क्रांतिबा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रा.श्री. संदीप निरंजन पाटील (M.Sc Bed. Chemisrty SET, NET) सध्या अभिनव एज्युकेशन सोसायटी, गंडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे हजारो विद्यार्थ्यांना अध्यापनाचे पवित्र कार्य करत आहेत.शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कमगिरी ची सुरुवात गेली वीस वर्षे पश्चिम महाराष्ट्र व सीमा भागामध्ये अविरतपणे सुरू आहे. बारावी सायन्स नंतर नीट जेईई सारख्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये विद्यार्थ्यांना अंतिम यशापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव तत्पर असतात.त्यांच्या या मार्गदर्शनामुळे हजारो विद्यार्थी डॉक्टर, अभियंता बनले.या सह परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावा यासाठी महाविद्यालय,शाळा या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष मार्गदर्शन करत असतात.
प्रा.संदीप पाटील,जयसिंगपूर यांनी स्त्रियांच्या सबलीकरणासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी अनेक ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. तसेच आपल्या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेहमी शैक्षणिक मार्गदर्शन करत असतात.यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील विविध महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करतात.
रसायनशाश्त्र या विषयामध्ये विद्यार्थ्यांना नेहमी नवनवीन माहिती व मार्गदर्शन देत असतात.महापूर व कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन प्रणाली द्वारे सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. आज पर्यंत च्या शैक्षणिक, सामजिक कार्याची दखल घेवून 'क्रांतिबा जोतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार' सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.महेश रजपूत, प्रा. उत्तम डांगे, प्रा. चिदानंद अळोळी मा.श्री उत्तम मंगल उपाध्यक्ष,मा.श्री विद्याधर रास्ते,मा.श्री प्रमोद काकडे,मा. श्री बाजीराव प्रज्ञावंत,सौ. संगीता कांबळे,मा.श्री दयानंद सरवदे व इतर मान्यवर उपस्थित होते.या विशेष सन्मानामुळे शिरोळ सह परिसरात विशेष कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा