![]() |
डॉ. जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूर |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूर आयोजित, ए.आय.सी.टी.इ. ट्रेनिंग अँड लर्निंग (ATAL) अकॅडमी स्पॉन्सर "कटिंग एज अप्रोचेस टू नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग अँड लार्ज लैंग्वेज मॉडेल्स" या विषयावरती ६ दिवसाचा 'ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे' आयोजन केले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद यांनी दिली.
ए. आय.सी. टी. च्या ₹ १ लाख विशेष अनुदानातून संपन्न होणाऱ्या या ६ दिवसीय कार्यशाळेमध्ये देश विदेशातील शास्त्रज्ञ, डायरेक्टर, प्रोफेसर व मशीन लर्निंग इंजिनियर्स प्रवेशित प्राध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत. १६ डिसेंबर २०२४ ते २१ डिसेंबर २०२४ सा. ६ ते रात्री ९ या कालावधीत हा प्रोग्रॅम घेण्यात येणार असून ऑनलाइन रजिस्ट्रेशन इच्छुकांनी दिनांक ७ डिसेंबर २०२४ अखेर https://atalacademy.aicte.india.org/login या संकेतस्थळावर करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजयराज मगदूम, व्हॉइस चेअरपर्सन डॉ.सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांच्या प्रेरणेतून प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ. अर्चना चौगुले, प्रा. आदित्य मगदूम कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा