![]() |
विद्यार्थी -पालक सभेत मार्गदर्शन करताना प्रसिद्ध.मानसोपचार तज्ञ सुरभी पाटील, अध्यक्षस्थानी डॉ. महावीर अक्कोळे,प्रा. आप्पासाहेब भगाटे, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व अन्य मान्यवर |
*प्रा.संदीप राजमाने : उपसंपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज मध्ये शिक्षक - पालक सहविचार सभा संपन्न झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. सुरभी पाटील व अध्यक्षस्थानी डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरज मांजरे व उपप्राचार्य प्रा.भारत आलदर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक सौ.सुरभी पाटील मार्गदर्शन करताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबतचे वेळेचे उत्तम नियोजन करून परीक्षेला आत्मविश्वासपूर्वक सामोरे जाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी तज्ञ मार्गदर्शकांनी केलेल्या सूचना व स्वयं अध्ययनावर विश्वास ठेवून परीक्षेला सामोरे जावे.
अध्यक्षीय भाष्य करताना डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी समाज माध्यमाच्या आहारी न जाता अभ्यासामध्ये प्रामाणिक व जिद्दीने श्रम केले पाहिजेत. पालकांनी आपल्या पाल्यांशी सुसंवाद साधून त्यांना समजावून घेणे आवश्यक आहे. याप्रसंगी प्रा. आप्पासाहेब भगाटे यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळ्यासाठी, सयंम व आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी समुपदेशन चे आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी विद्यार्थी हा ज्ञानात्मक व कार्यशील बनला पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच कॉलेजमधील ११ वी व १२ वी स्पेशल बॅच संदर्भात प्रा.व्ही.एस.पाटील यांनी माहिती दिली. उपस्थित पालक प्रकाश राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
या सभेचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.बी.ए.आलदर यांनी केले. आभार प्रा.गीता शिंदे यांनी मानले.सूत्रसंचालन सौ. विजेता पाटील व सौ.प्रणाली पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमांमध्ये पालक, सर्व प्राध्यापक वृंद,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा