![]() |
राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने ब्लॅंकेट चे वाटप |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : डॉ. जे. जे. मगदुम फार्मसी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) युनिटतर्फे थंडीच्या दिवसांत गरजू व्यक्तींना मदतीचा हात पुढे करीत ऊबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून या कॉलेजने सामाजिक जबाबदारी व सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.
जयसिंगपूर परिसरात वाढलेला थंडीचा कडाका अनुभवून स्वनिरक्षणातून एन.एस.एस. स्वयंसेवकांनी परिसरातील गरजू नागरिकांना थंडीच्या कठीण काळात दिलासा मिळवून देण्यासाठी चादरींचे वितरण केले. विद्यार्थ्यांनी समाजसेवेच्या या कार्यात विशेष उत्साह दाखवल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होतं आहे. डॉ. जे. जे.मगदूम ट्रस्टला एक सामाजिक आयाम आहे आणि त्याच भावनेतून ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजयराज मगदूम व व्हॉइस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.
या निमित्ताने गरजू व्यक्तींना दिलासा देणारे हे काम कौतुकास्पद आहे. समाजसेवेचा हा उपक्रम भविष्यातही सुरू राहावा, अशी अपेक्षा ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदुम यांनी व्यक्त करीत या उपक्रमाचे कौतुक करुन एन.एस.एस. युनिटला शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमासाठी एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रणिल तोरसकर व विद्यार्थी प्रतिनिधि कु. सात्विक चव्हाण यांचे विशेष योगदान लाभले. शैक्षणिक समन्वयक डॉ. सतीश किलजे, प्रा. रामलिंग माळी, प्रा. शुभम पाटील, प्रा. प्रतीक उगारे, प्रा. सौरभ समडोळे तसेच केदार खाडे, कुमार शिंदे, आदित्य मेंढेगिरी, धनंजय नरके, प्रथमेश जाधव, पार्थ काळबिरे, यश पाटील व जीशान मणेर ह्या विद्यार्थ्यानी या उपक्रमात सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा