Breaking

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

*विज्ञान कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिगत होऊन विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक ज्ञान उपासनेला गती मिळते : डॉ. महावीर अक्कोळे यांचे प्रतिपादन*


विज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व उपप्राचार्य प्रा. भारत आलदर 


*प्रा. संदीप राजमाने : उपसंपादक*


    जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज मध्ये तीन दिवसीय विज्ञान कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापक  मा.ए.बी.पुदाले  यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उपप्राचार्य प्रा.भारत आलदर  उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक मा.ए.बी.पुदाले मार्गदर्शन करताना म्हणाले, या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ होण्याचे मार्गदर्शन लाभते. जेणेकरून विद्यार्थी विज्ञानवादी दिशेने मार्गक्रमण करतो. विज्ञानवादी शैक्षणिक करिअरची उत्तम संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त होत असते.

     अध्यक्ष स्थानावर मार्गदर्शन करताना डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी  समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी स्वावलंबी बनावा हा दृष्टिकोन या कार्यशाळेचा आहे. ते पुढे म्हणाले, अशा कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिगत होऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञान उपासनेला गती मिळत असते असे मत व्यक्त केले.  प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी प्रयोगशील म्हणून आपलं भविष्य उज्वल केलं पाहिजे असे मत या निमित्ताने व्यक्त केले.

     डी.बी.टी.स्टार कॉलेज स्कीम अंतर्गत आर्थिक सहाय्य या कार्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. या तीन दिवसीय कार्यशाळांमध्ये शिरोळ तालुक्यातील  २३ शाळा व  एकूण १४७० विद्यार्थी सहभागी होत आहेत. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे प्रात्यक्षिके व मार्गदर्शन मोफत लाभणार आहे.

     या कार्यशाळेचे स्वागत उपप्राचार्य प्रा.बी.ए.आलदर यांनी स्वागत केले. कार्यशाळेचे समन्वयक प्रा.ए.टी.ऐनापुरे यांनी प्रास्ताविक  केले.या उद्घाटन समारंभाचे आभार डॉ. एम जे बुरसे यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. ए. एस. चावरे व सौ. एस. एस. मादनाईक यांनी केले. 

    सदर कार्यक्रमांमध्ये सर्व प्राध्यापक वृंद,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा