Breaking

बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

*प्रा.डॉ.एन.एल.कदम यांची कागलच्या डी.आर. माने कॉलेजच्या प्राचार्य पदी निवड*


जयसिंगपूर कॉलेज मध्ये सदिच्छा समारंभ प्रसंगी 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  :  येथील जयसिंगपूर कॉलेजचे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. एन. एल. कदम यांची डी.आर माने कॉलेज, कागल  येथे प्राचार्य पदी निवड झाली आहे.

     अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथील  डॉ.कदम यांनी जयसिंगपूर कॉलेज मध्ये २४ वर्ष अविरतपणे उत्तम सेवा बजावली आहे.प्राध्यापक, उपप्राचार्य,  accounatancy विषयाचे विभाग प्रमुख, अकॅडमी कौन्सिलचे सदस्य, Accountancy विषयाचे BoS chairman, sucomata चे अध्यक्ष, अनेक समितीवर विषय तज्ञ म्हणून काम करणारे प्रोफेसर डॉ.कदम यांची प्राचार्य पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    २ डिसेंबर २०२४ ला जयसिंगपूर कॉलेज येथून कार्यमुक्त झाले आहेत. त्यांना शुभेच्या देण्यासाठी सदिच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.सुभाष अडदंडे होते. याप्रसंगी डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील,अशोक शिरगुप्पे,प्रा. अप्पासाहेब भगाटे, डॉ.धवलकुमार पाटील व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

    याप्रसंगी  प्रा.डॉ. टी.जी.घाटगे, प्रा.डॉ. बी.एम सरगर,प्रा.सुनील चौगुले, डॉ.एस आर नकाते आणि प्रा.आलदार यांनी आपल्या मनोगतातून डॉ.कदम यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य व्यक्त केले.

   कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.विजयमाला चौगुले यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीदेवी नकाते आणि प्रा.डॉ. सुजाता पाटील यांनी केले.

      या कार्यक्रमास सीनियर व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व  प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा