![]() |
अमर इराप्पा चौगुले, हसुर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : हसुर (ता.शिरोळ जि. कोल्हापूर) येथून अमर इराप्पा चौगुले (वय वर्षे ३९) हा तरुण बेपत्ता झाला असून पत्नी सुरेखा चौगुले यांनी याबाबत शिरोळ पोलिसात वर्दी दिली आहे.
अधिकृत सूत्रांकडून दिलेले माहिती अशी की, बेपत्ता अमर चौगुले हा १ डिसेंबर,२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास गावातील मादनाईक दूध डेअरी येथे कामासाठी जावून येतो असे सांगुन घरातुन निघुन गेला आहे. अद्यापही तो घरी परत आलेला नाही. उंची ५ फुट ६ इंच, चेहरा गोल, नाक सरळ, रंगाने सावळा, अंगाने जाड, केस काळे, अंगात गुलाबी रंगाचा व त्यावर काळया रंगाच्या रेषांचा हाफ बाहयांचा शर्ट व पायात काळी फूल पॅन्ट असे त्याचे वर्णन असून तो मराठी व कन्नड भाषा बोलतो. सदर वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास शिरोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिरोळ पोलिसांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा