Breaking

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

सत्तेपुढे सत्य ठामपणे सांगितले पाहिजे : ॲड.असीम सरोदे


डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमालेत पुष्प गुंफतना
 ॲड असीम सरोदे, डॉ. महावीर अक्कोळे व डॉ. राजेंद्र कुंभार


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : सत्तेतल्या लोकांनी मग ते कुणीही असो त्यांना बोलण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे आणि त्यासाठी सत्तेपुढे सत्य ठामपणे व निर्भयपणे सांगितले पाहिजे असे प्रतिपादन प्रख्यात वकील ॲड.असीम सरोदे यांनी जयसिंगपूर येथे केले. डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. 

   जयसिंगपूर कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या या सभेत ते पुढे म्हणाले की, केवळ पुरावा नाही म्हणून दोषी लोकांनी स्वतःला निर्दोष समजू नये. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या सारख्या महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये आता कट्टरवादी विचार वाढताना दिसतो आहे असे नमूद करून त्यांनी न्याय व्यवस्थेची पडझड आणि निमुटपणे गप्प राहून स्वीकारता कामा नये अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त केली. न्यायाचे अर्थशास्त्र नीट समजून घेतली पाहिजे तसेच लोकांच्या सहभागाशिवाय कायदे बनवले जाता कामा नये असेही त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले. 

     व्याख्यानमाला रद्द करण्याचा काही हिंदुत्ववाद्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात व्याख्यानमाला पार पडली.या सभेचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले तर प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी वक्त्याची ओळख करून दिली. प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी आभार मानले. तर प्रा.डॉ.सुजाता पाटील व प्रा. सुनील चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.

   या व्याख्यानमालेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिले. या व्याख्यान मालाच्या दोन्हीही दिवशी माजी खासदार राजू शेट्टी यांनी श्रोता म्हणून हजेरी लावली हे विशेष, जयसिंगपूर कॉलेज स्थानिक समिती आणि अक्कोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे यांच्या स्मृति दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा